वरळीमधील बीडीडी चाळीत झालेल्या गॅस सिलिंडरच्या स्फोट चौघेजण गंभीर जखमी जाले होते. त्यांना तातडीने नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यादरम्यान ४ महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी टीका केली होती. शेलारांनी केलेल्या टीकेविरोधात महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहून तक्रार केली आहे.
३० नोव्हेंबर रोजी वरळीमध्ये गॅस सिलिंडरच्या स्फोट झालेल्या घटनेत ४ महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाला असून त्याच्या आई-वडिलांचाही या दुर्घेटनेत निधन झाले. त्यामुळे याप्रकरणी ४ डिसेंबर रोजी आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत मुंबई महापौरांवर टीका केली. सिलिंडर स्फोटात ७२ तासानंतर मुंबईचे महापौर पोहोचतात. एवढे तास कुठे निजला होतात, अशी टीका शेलारांन केली. यावर महापौरांनी आक्षेप घेत राज्याच्या गृहमंत्र्यांकडे पक्ष लिहित तक्रार केली आहे.
मी निजेल असले तर आशिष शेलार कोरोनामध्ये अंगाई गात होते का? असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला असून शेलारांना प्रत्युत्तर दिले आहे. मुंबईची महापौर ही एक महिला आहे. आशिष शेलार यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत असून त्यांनी माझा आणि समस्स स्त्रियांचा अपमान केला आहे. त्यामुळे आशिष शेलार यांच्यविरोधात पोलिसांमध्ये तक्रार करणार असल्याचे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल भाजपा आमदार आशिष शेलार यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात मुंबई पोलीस मुख्यालयात शिवसेनेचे शिष्टमंडळ तक्रार दाखल करण्यासाठी गेले. पोलीस सहआयुक्त विश्वास नागरे पाटील यांची शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली. विशाखा राऊत, शिवसेना उपनेत्या मीनाताई कांबळी आणि शिसवनेच्या मुंबई महिला विभाग प्रमुख शिष्टमंडळात होत्या.