पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या पत्राने खळबळ

महसूल यंत्रणेकडून कार्यकारी दंडाधिकारी पदाचे अधिकार काढून घेण्याची मागणी नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यानी राज्य पोलीस महासंचालकांना पत्र लिहिल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी पत्रात महसूल यंत्रणेवर जोरदार प्रहार केला आहे. महसूल यंत्रणेकडून कार्यकारी दंडाधिकारी पदाचे अधिकार काढून घेण्याची मागणी पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी केली आहे. महसूल अधिकाऱ्यांकडे असणारे अधिकार […]

पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या पत्राने खळबळ

महसूल यंत्रणेकडून कार्यकारी दंडाधिकारी पदाचे अधिकार काढून घेण्याची मागणी

नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यानी राज्य पोलीस महासंचालकांना पत्र लिहिल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी पत्रात महसूल यंत्रणेवर जोरदार प्रहार केला आहे. महसूल यंत्रणेकडून कार्यकारी दंडाधिकारी पदाचे अधिकार काढून घेण्याची मागणी पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी केली आहे.

महसूल अधिकाऱ्यांकडे असणारे अधिकार हे आरडीएक्स सारखे आहेत तर, कार्यकारी दंडाधिकाऱ्यांकडे असलेले अधिकार हे डिटोनेटर सारखे आहेत. यातून एक जिवंत बॉम्ब बनतो जो भूमाफिया यांच्या मर्जीप्रमाणे वागतो. हे भूमाफिया महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून सर्वसामान्य नागरिकांचा छळ करतात. त्यामुळे महसूल यंत्रणेकडून कार्यकारी दंडाधिकारी पदाचे अधिकार काढून शहरीकरण झालेल्या ठिकाणचे अधिकार पोलीस आयुक्तालयाला देण्याची मागणी दीपक पांडे यांनी पत्राद्वारे केली आहे. तसेच मालेगाव शहराला आयुक्तालयाचा दर्जा देण्याची मागणीही दीपक पांडे यांनी केली आहे.

नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी महासंचालकांना लिहिलेल्या पत्रामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच आता राज्य पोलीस महासंचालक दीपक पांडे यांच्या पत्राला काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number