CNG PNG Rates: नवीन वर्षाची सुरूवात दिलासादायक ; सीएनजी-पीएनजी दर कमी होण्याची शक्यता

नियामक मंडळाने गॅस वितरण कंपन्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, दरातील सवलतीचा पूर्ण फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवला जावा. याची अंमलबजावणी होत आहे की नाही, यावर नियमित नजर ठेवली जाणार आहे.

CNG PNG Rates: नवीन वर्षाची सुरूवात दिलासादायक ; सीएनजी-पीएनजी दर कमी होण्याची शक्यता

मुंबई: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सामान्य नागरिकांसाठी दिलास्याची बातमी समोर येण्याची शक्यता आहे. 1 जानेवारी 2026 पासून सीएनजी आणि घरगुती पीएनजी गॅसचे दर कमी होऊ शकतात, अशी चर्चा जोर धरू लागली असून, यामुळे लाखो कुटुंबांचे मासिक बजेट हलके होणार आहे. उपलब्ध माहितीनुसार, गॅसच्या किमतींमध्ये 2 ते 3 रुपयांची कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
ही दरकपात कोणत्याही तात्पुरत्या निर्णयाचा भाग नसून, देशभर लागू होणाऱ्या नव्या दररचनेचा परिणाम असणार आहे. पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्डाने नैसर्गिक वायूच्या वाहतुकीसाठीची टॅरिफ प्रणाली अधिक तर्कसंगत करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे गॅसचे दर अधिक समतोल आणि सर्वसामान्यांना परवडणारे करण्याचा प्रयत्न स्पष्टपणे दिसून येतो.
 
आतापर्यंत अंतरावर आधारित तीन झोनची दरप्रणाली अस्तित्वात होती. मात्र आता ती प्रणाली रद्द करून फक्त दोन झोनमध्ये संपूर्ण देशाचे विभाजन करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे, पहिला झोन थेट देशभरातील सीएनजी वाहनधारक आणि घरगुती पीएनजी ग्राहकांवर लागू होणार आहे. या झोनसाठीचा एकसमान दर 54 रुपये प्रति युनिट निश्चित करण्यात आला असून, याआधी ज्या ग्राहकांना 80 किंवा 107 रुपये दर मोजावे लागत होते, त्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा: Central Railway : मोठी कारवाई! मध्य रेल्वे ॲक्शन मोडमध्ये, फुकट्यांकडून कोट्यवधी रूपयांचा दंड वसूल

 
या नव्या निर्णयाचा फायदा देशातील 40 शहर गॅस वितरण कंपन्यांच्या कार्यक्षेत्रातील ग्राहकांना होणार आहे. विशेषतः रोज सीएनजीवर अवलंबून असलेले वाहनचालक आणि स्वयंपाकासाठी पीएनजी वापरणारी मध्यमवर्गीय कुटुंबे यांना या दरकपातीचा थेट लाभ मिळेल.
 
नियामक मंडळाने गॅस वितरण कंपन्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, दरातील सवलतीचा पूर्ण फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवला जावा. याची अंमलबजावणी होत आहे की नाही, यावर नियमित नजर ठेवली जाणार आहे. ग्राहकांचे हित आणि कंपन्यांचे आर्थिक संतुलन यामध्ये योग्य तो तोल राखण्याचा हा प्रयत्न असल्याचेही बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
 
दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकारांमधील समन्वयामुळे अनेक राज्यांनी नैसर्गिक वायूवरील कर कमी केले आहेत. परवाना प्रक्रिया सुलभ करण्यात आल्याने गॅस वितरणाचा विस्तारही वेगाने होत आहे. परवडणाऱ्या दरात स्वच्छ इंधन उपलब्ध करून देणे, हा सरकारचा मुख्य उद्देश असल्याचे या निर्णयातून स्पष्ट होते.
 
एकूणच, सीएनजी आणि पीएनजी दरातील संभाव्य कपात केवळ आर्थिक दिलासा देणारी नाही, तर नैसर्गिक वायूचा वापर वाढवून पर्यावरणपूरक भारताकडे नेणारा महत्त्वाचा टप्पा ठरण्याची चिन्हे आहेत. नवीन वर्षात गॅस ग्राहकांसाठी ही खऱ्या अर्थाने गुड न्यूज ठरू शकते.

हेही वाचा: Gautami Patil : "जे बिग बॉसच्या घरात जातात त्यांच…" लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोबद्दल गौतमी पाटीलची प्रतिक्रिया

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number