पिंपरी-चिंचवडमध्ये मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

पिंपरी-चिंचवडमध्ये मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

पिंपरी चिंचवडमध्ये रिंग रोड बाधितांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला.

 

विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री शनिवारी पिंपरी- चिंचवडमध्ये आले होते. मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आंदोलनकर्ते भोसरीत दाखल झाले होते.

 

पोलिसांनी कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याची वेळ दिली. मात्र, कार्यक्रम संपल्यानंतरही मुख्यमंत्र्यांना भेटू न दिल्यानं आंदोलनकर्त्यांनी सभागृहाचा गेट

अडवून धरला. त्यानंतर त्यांना निवेदन देण्यासाठी सभागृहात सोडण्यात आले.

 

मात्र, सभागृहाबाहेर पडताच आंदोलनकांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version