जय महाराष्ट्र न्युज, मुंबई
मुंबईत रंगशारदा सभागृहात राज्य शासनातर्फे राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक – २o१८ पार पडली . या बैठकीनंतर खरीप हंगामासाठी शासनानं केलेल्या नियोजनासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांनी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवारासाठी हा काळ महत्वाचा असल्याचं म्हटलं आहे.
याचबरोबर प्रत्येक शेतक-याला वेळेत कर्ज मिळण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही मुख्यमंत्री म्हणालेत. सरकारनं बँकांना पैसे दिले मात्र 3 लाख शेतक-यांच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्याचंही फडणवीस म्हणाले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.