जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
शेतकरी संपाच्या नावाखाली काँग्रेस-राष्ट्रवादीकडून हिंसेचा कट केला जात असल्याचा थेट आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
पोलिसांशी संघर्ष व्हावा, संपाला गालबोट लागावं आणि संप चिघळावा यासाठी काही राजकीय नेते प्रयत्न करत असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीला टार्गेट केलं.
तसेच शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे दुधाला भाव देण्याचं आवाहन त्यांनी केलं. त्याचबरोबर सरसकट कर्जमाफी करणं शक्य नाहीये पण कर्जमाफीसंदर्भात सकारात्मक विचार सुरु असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.