जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
भाजपा सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफीचा काही कारणानं ज्या शेतकऱ्यांना अर्ज भरता आला नाही. त्यांच्यासाठी आता मुदत वाढवण्यात आलीय. कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी आता 1 मे 2018पर्यंत मुदत वाढवून देण्यात आलीय. मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेता आहे.
तर वन टाइम सेटलमेंट योजनेसाठी यापूर्वीच 30 जून 2018पर्यंत मुदत वाढवण्यात आलीय. 2017च्या दिवाळीत भाजपा सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास सुरुवात केली होती. मात्र, या कर्जमाफीसाठी काही शेतकऱ्यांना अर्ज दाखल करता आला नव्हता. मात्र, आता यासाठी शेतकऱ्यांना 1 मेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे.