काही आजार असे असतात जायच्या उपचारासाठी आपल्याला भरपूर पैसे खर्च करावे लागलात. परंतू आयुर्वेदात या आजारांवर एक घरगुती उपाय आहे. तो म्हणजे गुलार. गुलार म्हणजे सायकमोर, हे एक औषधी वृक्ष आहे.गुलारमध्ये अँटी-पायरेटिक, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीमाइक्रोबियल, अँटीडायबेटिक . गुणधर्म असतात. गुलारमुळे मधुमेह, यकृताचे विकार, मूळव्याध, जुलाब आणि फुफ्फुसाच्या आजारांवर उपचार करण्यास मदत करते.
गुलारचा उपयोग आयुर्वेदात यकृताचा आजार बरा करण्यासाठी केला जातो. गुलारच्या पानांमध्ये यकृताचे विकार बरे करणारे गुणधर्म असतात. यकृत निरोगी ठेवण्यासाठी ते फायदेशीर ठरते.
बद्धकोष्ठतेमुळे गुदद्वाराच्या नसांना सूज येते. याच विकाराला मूळव्याध म्हणतात. गुलारचे दाहक-विरोधी गुणधर्म या आजारापासून आराम मिळण्यास मदत करतात.
अतिसाराच्या समस्येवर गुलार उपयोगी ठरते. गुलारच्या पानांचा रस अतिसारावर फायदेशीर असतो.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.