Mumbai Crime: चिंतामणीच्या आगमन सोहळ्यात हातचलाखी! चिंचपोकळीत 11 भाविकांचे महागडे मोबाईल गायब; पोलिस तपास सुरू

मुंबईतील चिंचपोकळीच्या चिंतामणी आगमन सोहळ्यात गर्दीचा फायदा घेत 11 जणांचे 8.27 लाख रुपयांचे महागडे मोबाईल चोरीला गेले. या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Mumbai Crime: चिंतामणीच्या आगमन सोहळ्यात हातचलाखी! चिंचपोकळीत 11 भाविकांचे महागडे मोबाईल गायब; पोलिस तपास सुरू

मुंबईतील प्रसिद्ध चिंचपोकळीच्या चिंतामणी गणपतीच्या आगमन सोहळ्यात यंदा भाविकांच्या प्रचंड गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरांनी धुमाकूळ घातला. 29 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या या आगमन सोहळ्यादरम्यान तब्बल 11 जणांचे मोबाईल चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, हजारो पोलिसांचा बंदोबस्त असतानाही या चोरीच्या घटना घडल्याने सुरक्षेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तक्रारदारांच्या माहितीनुसार, दुपारी 3 ते रात्री 8 वाजेच्या दरम्यान गर्दीत त्यांच्या मोबाईलची चोरी झाली. चोरी झालेल्या मोबाईलची एकूण किंमत 8 लाख 27 हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. चोरीस गेलेल्या मोबाईलमध्ये महागड्या स्मार्टफोनचा समावेश असून त्यात iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max, iPhone 16, iPhone 15 Plus, Vivo X300 Pro, Motorola Edge 60 Pro तसेच Redmi कंपनीच्या मोबाईलचा समावेश आहे.

या प्रकरणी सर्व तक्रारींची नोंद घेऊन काळाचौकी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. दरवर्षी लाखो भाविक उपस्थित राहणाऱ्या या आगमन सोहळ्यात यंदा घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी आपल्या मौल्यवान वस्तूंची अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे पोलिसांकडूनही सांगण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number