मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुण्यात बालेवाडी स्टेडियमवर आयोजित केलेल्या कार्यक्रमात चांगलीच राजकीय फटकेबाजी केली.
राजकारणात आणि पोलिसात फरक आहे. राजकारणात ‘कही पे निगाहे कही पे निशाणा’ असं असत.
मात्र, तुमचं ज्या ठिकाणी निशाणा आहे तिथेच असतो. तुमचा नेम कधी चुकत नाही. अशी फटकेबाजी ठाकरे यांनी केली आहे. यावक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
१३ व्या अखिल भारतीय पोलीस नेमबाजी (क्रिडा) अजिंक्यपद स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमात बोलत होते.
हा कार्यक्रम पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने आयोजित केला होता.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, पुणे पोलीस आयुक्त के.व्यंकटेशम आदी उपस्थित होते.
‘संपूर्ण देशातून साडेपाचशे स्पर्धक सहभागी झाले होते.
आपण विविध राज्यातून आलेला आहात. मला तर वाटत हिंदुस्थान मधील प्रत्येक पोलिसांचा निशाणा योग्य लागला पाहिजे.
पोलिसांची काळजी घेणे सरकार ची जिम्मेदारी आहे ती आम्ही घेऊ’. असेही उद्धव ठाकरे या कार्यक्रमादरम्यान म्हणाले.
पोलिसांच्या चांगल्या आरोग्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. नेमबाजी श्वासावर नियंत्रण ठेवणारा उत्तम योगप्रकार आहे.
यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील पोलिसांसाठी नेमबाजी केंद्र उभारण्यासाठीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
तसेच यासाठी पोलिस विभागांना त्वरित यासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्याची सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी केली.