Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरात किळसवाणा प्रकार! फालुद्यात चक्क जिवंत अळी; व्हिडिओ व्हायरल

छत्रपती संभाजीनगरच्या सिडकोतील आयसी स्पायसी हॉटेलमध्ये फालुद्यात जिवंत अळी आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरात किळसवाणा प्रकार! फालुद्यात चक्क जिवंत अळी; व्हिडिओ व्हायरल

छत्रपती संभाजीनगरच्या सिडको परिसरातील एका हॉटेलमध्ये फालुद्यामध्ये जिवंत अळी आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळली असून शहरातील खाद्यपदार्थांच्या दर्जा आणि स्वच्छतेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सिडको परिसरातील आयसी स्पायसी या हॉटेलमध्ये एका ग्राहकाने फालुदा ऑर्डर केला होता. पेय पिण्यापूर्वी त्याच्या नजरेस ग्लासमध्ये एक जिवंत अळी तरंगताना दिसली. हा प्रकार लक्षात येताच ग्राहकाने तात्काळ संपूर्ण घटना मोबाईलमध्ये चित्रित केली आणि हॉटेल प्रशासनाकडे नाराजी व्यक्त केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये अन्नपदार्थांमध्ये निष्काळजीपणाच्या घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी एका मिठाई दुकानातून खरेदी केलेल्या कचोरीमध्ये उंदराच्या विष्ठेसारखा पदार्थ आढळल्याचा प्रकार चर्चेत आला होता. त्याआधी एमजीएम रुग्णालयाच्या कॅन्टीनमधील जेवणात अळी सापडल्यानेही मोठा वाद निर्माण झाला होता.या घटनांनंतर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) शहरातील काही हॉटेल्स आणि खाद्य व्यवसायांवर कारवाई करत काही परवाने निलंबित केले होते. तरीही अशा घटना घडत असल्याने अन्न सुरक्षा नियमांची अंमलबजावणी अधिक कडक करण्याची मागणी होत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number