चेन्नईतील एका पतीने आपला इतर दुसऱ्या महिलेशीही संबंध असल्याचा दावा केल्यानंतर त्याच्या पत्नीने आत्महत्या केली आहे, पुष्पलता असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
सुप्रीम कोर्टाने नुकताच आयपीसी कलम 497 खंडित करीत यापुढे व्यभिचार देशामध्ये गुन्हेगारी नाही असा निर्णय सुनावला होता.
सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर व्यभिचार प्रकरणातील हा पहिला बळी ठरला आहे.
या महिलेच्या पतीने तिला आव्हान दिले की इतर कोणाशी संबंध ठेवण्यापासून त्याला रोखण्याचा तिला अधिकार नाही, यानंतर तिने आपलं जीवन संपवलं
पूर्वी आयपीसी कलम 497 नुसार व्यभिचार एक गुन्हा होता आणि दोषीला 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली जायची.
पुष्पलताने जॉन पॉल फ्रँकलिनशी 2 वर्षांपूर्वी लवमॅरेज केले होते त्यांना एक मुलगाही आहे.
या घटनेनंतर मृत महिलेच्या पालकांकडून तीव्र विरोध केला जात आहे.