Chakan Traffic Jam: चाकणमध्ये वाहतुकीचा बोजवारा! 8 तासांपासून वाहतूक कोंडी, तब्बल 5 किलोमीटर वाहनांच्या रांगा

चाकण औद्योगिक परिसरात आठ तासांपासून वाहतूक कोंडी कायम असून पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. कामगार, विद्यार्थी आणि अवजड वाहने कोंडीत अडकली आहेत.

Chakan Traffic Jam: चाकणमध्ये वाहतुकीचा बोजवारा! 8 तासांपासून वाहतूक कोंडी, तब्बल 5 किलोमीटर वाहनांच्या रांगा

पुणे जिल्ह्यातील चाकण औद्योगिक परिसरात वाहतूक कोंडीने गंभीर स्वरूप धारण केले आहे. चाकण-तळेगाव मार्गावर गेल्या आठ तासांपासून वाहनांची वाहतूक संथ गतीने सुरू असून, रस्त्यावर तब्बल पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या कोंडीचा मोठा फटका कामगार, विद्यार्थी तसेच वाहनचालकांना बसत आहे.

चाकण औद्योगिक वसाहतीत दररोज मोठ्या प्रमाणात कामगार आणि अवजड वाहनांची ये-जा असते. मात्र, आज निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीमुळे कामगारांना घेऊन जाणाऱ्या बस, शाळकरी विद्यार्थ्यांच्या बस आणि मालवाहतूक करणारी अवजड वाहने रस्त्यावरच अडकून पडली आहेत. त्यामुळे अनेकांना वेळेत आपल्या ठिकाणी पोहोचता आले नाही.

वाहतूक कोंडीमुळे चाकण-तळेगाव मार्गावरील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाढला असून, वाहनचालकांना तासन्तास एकाच ठिकाणी थांबावे लागत आहे. औद्योगिक परिसरातील वाहतुकीवरही याचा परिणाम झाला असून, मालाची वाहतूक आणि कामगारांच्या दैनंदिन प्रवासात अडथळे निर्माण झाले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number