मुंबईतील माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या अपघातामुळे लोकल वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सकाळी कामाला निघालेल्या मुंबईकरांचे मोठे हाल झाले आहेत. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे तसेच रेल्वे उशीराने आणि धिम्या गतीने असल्यामुळे अनेक प्रवासी रुळातून चालत निघाले आहेत.
शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास माटुंगा रेल्वेस्थानकाजवळ दादर-पद्दुचेरी एक्सप्रेसचे तीन डबे घसरल्यामुळे अपघात घडला. दरम्यान, रुळावरून घसरलेल्या तीन डब्यांपैकी दोन डबे रुळावर आणण्यात प्रशासनाला यश आले आहे. तर सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आज दुपारी १२ वाजेपर्यंत वाहतूक सुरू होण्याचा अंदाज मध्य रेल्वेने वर्तवला आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे रुळ दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून भायखळा ते माटुंगा रेल्वे स्थानकांवरील जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे.
11005 derailment updates👇
Re-railment of coaches, OHE wire and track fitness work is being carried out on war footing. It is expected to complete this work by 12 noon today. During this period, fast line Traffic will be diverted on slow corridor b/w Byculla and Matunga stations. — Central Railway (@Central_Railway) April 16, 2022
१२११० मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेस
११०१० पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस
११००९ मुंबई-पुणे सिंहगड एक्सप्रेस
०२१०२ मनमाड-मुंबई समर स्पेशल
०२१०१ मुंबई-मनमाड समर स्पेशल
१२१२४ पुणे-मुंबई डेक्कन क्वीन
१२१२३ मुंबई-पुणे डेक्कन क्वीन
Trains Update – 6
Trains cancelled/short terminated/short originated/rescheduled pic.twitter.com/K06itMmJoR — Central Railway (@Central_Railway) April 16, 2022
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.