10 डिसेंबर म्हणजेच आज सकाळी मध्य रेल्वेवरील प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. ऐन कामाच्या वेळेस मध्य रेल्वेवर मोठा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला. मध्य रेल्वेच्या मुंबई-कर्जत उपनगरीय मार्गावर वांगणी आणि बदलापूर या दोन स्थानकांदरम्यान रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होते. ज्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.
बदलापूर रेल्वे स्थानकावरून कर्जतच्या दिशेने निघणाऱ्या आणि कर्जतहून सीएसटीकडे येणाऱ्या मार्गावर असलेल्या सर्व लोकल गाड्या ट्रॅकवरच रखडल्या होत्या. त्यानंतर आता यामगचं कारण आता समोर आलं आहे. मध्य रेल्वेच्या 11089 या मुंबई-पुणे एक्स्प्रेस धावत्या ट्रेनमध्ये यात्रेकरू सिगरेट पित होता त्यामुळे ट्रेन मधील स्मोक डिटेक्टर सक्रिय झालं आणि ट्रेन कर्जत-वांगणी या दरम्यान बंद झाली. रेल्वे प्रशसनाकडून तत्काळ यावर तपासणी केली.
मात्र ट्रेन मधील इतर यात्रेकरूंना ही गोष्ट लक्षात येताच सजग नागरिकांनी धावत्या ट्रेनमध्ये सिगरेट ओढत असलेल्या यात्रेकरूला खाली उतरण्यास सांगण्यात आले. आज पहाटे 5 वाजून 50 मिनट ते 6 वाजून 14 मिनटपर्यंत हा प्रकार घडला आणि याचा परिणाम मध्य रेल्वे वाहतूक व्यवस्थेवर झालेला पहायाला मिळाला. मात्र मध्य रेल्वेच्या तत्काळ कारवाईमुळे मध्य रेल्वे 20-25 मिनटाने पुन्हा पूर्ववत झाली असली तरी रेल्वे वाहतूक सकाळी सकाळी विस्कळीत झाल्याने याचा परिणाम कामावर जाणाऱ्या प्रवाशांवर झाला. मात्र धावत्या रेल्वेत सिगरेट ओढत असलेल्या व्यक्तीवर मध्य रेल्वे प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.