Summer Special Railway : आता प्रवासात दूर होणार गर्दीचा त्रास; मध्य रेल्वेसह पश्चिम रेल्वेची उन्हाळी स्पेशल गाड्यांची घोषणा

उन्हाळ्यात प्रवाशांची गैरसोय होऊ नये, गर्दीचे व्यवस्थित नियोजन करता यावे, याकरता मध्य रेल्वे तसेच पश्चिम रेल्वेने विशेष गाड्या चालवण्याचे योजले आहे.

Summer Special Railway : आता प्रवासात दूर होणार गर्दीचा त्रास; मध्य रेल्वेसह पश्चिम रेल्वेची उन्हाळी स्पेशल गाड्यांची घोषणा

मुंबई : काही दिवसांतच मुलांच्या शाळा – कॉलेजच्या परीक्षा संपून त्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतील. त्यानंतर बहुतांश लोकं उन्हाळी सुट्टीच्या निमित्ताने आपापल्या गावी किंवा इतर राज्यांमध्ये फिरण्याकरता जाण्याची योजना आखतात. अशातच रेल्वे गाड्यांसाठी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. उन्हाळ्यात प्रवाशांची गैरसोय होऊ नये, गर्दीचे व्यवस्थित नियोजन करता यावे, याकरता मध्य रेल्वे तसेच पश्चिम रेल्वेने विशेष गाड्या चालवण्याचे योजले आहे. त्यानुसार मध्ये रेल्वेकडून 46 अतिरिक्त विशेष सेवा तर पश्चिम रेल्वेकडून पाच उन्हाळी स्पेशल गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे.  

मध्य रेल्वे 46 अतिरिक्त विशेष सेवा उन्हाळी सुट्ट्यांमधील गर्दीचा ताण कमी करण्यासाठी चालवणार असून यात मुंबई आणि मडगाव दरम्यान 20 सेवा तसेच मुंबई आणि संतरागाछी दरम्यान 26 सेवा चालवली जाणार आहे. 46 अतिरिक्त विशेष सेवा यापैकी 20 सेवा मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (छशिमट) ते मडगाव दरम्यान, तर 26 सेवा मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस ते संत्रागाची दरम्यान चालवल्या जाणार आहेत.

छशिमट – मडगाव – छशिमट साप्ताहिक विशेष गाड्या (20 सेवा)

ट्रेन क्रमांक 01019 ही साप्ताहिक विशेष गाडी 5 एप्रिल 2026 ते 7 जून 2026 या कालावधीत, छशिमट येथून दर रविवारी 00.55 वाजता सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी 15.15 वाजता पोहोचेल. (१० सेवा)

ट्रेन क्रमांक 01020 ही साप्ताहिक विशेष गाडी 5 एप्रिल 2026 ते 7 जून 2026 या कालावधीत मडगाव येथून दर रविवारी 16.00 वाजता सुटेल आणि छशिमट येथे दुसऱ्या दिवशी 03.50 वाजता पोहोचेल. (10 सेवा)

या गाड्या दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिवि आणि करमळी या स्थानकांवर थांबतील. तसेच गाड्यांची संरचना ही एक वातानुकूलित द्वितीय, 6 वातानुकूलित तृतीय, 9 शयनयान, 4 सामान्य द्वितीय आणि 2 सामान्य द्वितीय श्रेणी-सह-गार्ड ब्रेक व्हॅन अशी असणार आहे. 

लोकमान्य टिळक टर्मिनस – संतरागाछी – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष (26 सेवा)

ट्रेन क्रमांक 01001 ही साप्ताहिक विशेष गाडी 21 एप्रिल 2026 ते 14 जुलै 2026 या कालावधीत, लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून दर मंगळवारी 20.15 वाजता सुटेल आणि संतरागाछी येथे तिसऱ्या दिवशी 05.00 वाजता पोहोचेल. (13 सेवा)

ट्रेन क्रमांक 01002 ही 'साप्ताहिक विशेष' गाडी 23 एप्रिल 2026 ते 16 जुलै 2026 या कालावधीत, संतरागाछी येथून दर गुरुवारी 15.50 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी 23.45 वाजता पोहोचेल. (13 सेवा)

या गाड्या ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, बडनेरा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राउरकेला, चक्रधरपूर, टाटानगर आणि खरगपूर या स्थानकांवर थांबतील. तसेच गाड्यांची संरचना ही 2 वातानुकूलित द्वितीय, 10 वातानुकूलित तृतीय (इकॉनॉमी), 4 शयनयान, 4 सामान्य द्वितीय आणि 2 जनरेटर डब्बे अशी असणार आहे. 

अशा प्रकारे करता येईल आरक्षण –

विशेष ट्रेन क्रमांक 01019 साठीचे आरक्षण 1 एप्रिल 2026 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर खुले होईल.
विशेष ट्रेन क्रमांक 01001 साठीचे आरक्षण 31 मार्च 2026 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर खुले होईल.
सामान्य दरांवर आधारित अनारक्षित डब्यांसाठीचे तिकीट UTS प्रणालीद्वारे करता येईल.
तिकिटांच्या आरक्षणासाठी प्रवासी 'RailOne' ॲप देखील डाउनलोड करू शकतात.
या विशेष गाड्यांच्या थांब्यांवरील वेळापत्रकाची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.

हेही वाचा : Maharashtra Unseasonal Rain: राज्यावर अवकाळीचे अस्मानी संकट; बळीराजाच्या डोळ्यांत पाणी, द्राक्ष-डाळिंबाच्या बागा भुईसपाट

मध्य रेल्वेप्रमाणेच पश्चिम रेल्वेने देखील पाच उन्हाळी स्पेशल गाड्यांची घोषणा केली असून गुजरातसह उत्तर भारतात जुलै महिन्यापर्यंत 150 फेऱ्या चालवल्या जाणार असल्याचे सांगितले आहे. या पाच गाड्यांच्या जुलै महिन्यापर्यंत प्रत्येकी 30 प्रमाणे एकूण 150 फेऱ्या चालविण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक 02200/02199 वांद्रे टर्मिनस-वीरंगना लक्ष्मीबाई झाँसी उन्हाळी स्पेशल सुपरफास्ट एक्सप्रेस 4 एप्रिल ते 11 जुलैपर्यंत धावेल. ही गाडी दर शनिवारी वांद्रे टर्मिनस येथून सकाळी 05.10 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 05.00 वाजता वीरंगना लक्ष्मीबाई झाँसी येथे पोहोचेल.

ट्रेन क्रमांक 04126/04125 वांद्रे टर्मिनस-सुभेदारगंज उन्हाळी विशेष सुपरफास्ट एक्सप्रेस 7 एप्रिल ते 14 जुलैपर्यंत धावेल. ही गाडी दर मंगळवारी सकाळी 11.15 वाजता वांद्रे टर्मिनस येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी 05.00 वाजता सुभेदारगंजला पोहोचेल. तर ट्रेन क्रमांक 05184/05183 वांद्रे टर्मिनस-आझमगड सुपरफास्ट स्पेशल एक्सप्रेस 6 एप्रिल ते 13 जुलैपर्यंत धावेल. ही गाडी दर सोमवारी वांद्रे टर्मिनस येथून सकाळी 10.45 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 08.10 वाजता आझमगडला पोहोचेल. तसेच ट्रेन क्रमांक 05034/05033 वांद्रे टर्मिनस – गोमती नगर स्पेशल ट्रेन 7 एप्रिल ते 13 जुलैपर्यंत धावेल. ही गाडी दर मंगळवारी वांद्रे टर्मिनस येथून रात्री 11.00 वाजता सुटेल आणि गुरुवारी सकाळी 07.45 वाजता गोमती नगरला पोहोचेल. शिवाय ट्रेन क्रमांक 05018/05017 वलसाड – माऊ विशेष ट्रेन 5 एप्रिल ते 12 जुलैपर्यंत धावेल. ही गाडी दर रविवारी वलसाड स्थानकावरून दुपारी 03.10 वाजता वलसाडहून सुटेल आणि मंगळवारी रात्री 12.45 वाजता माऊ येथे पोहोचेल.

31 मार्चपासून आरक्षण सुरू

मुंबई वांद्रे टर्मिनस येथून सुटणाऱ्या ट्रेन क्रमांक 02200, 04126, 05184, 05034 आणि वलसाड येथून सुटणाऱ्या ट्रेन क्रमांक 05018 साठी तिकिटांचे आरक्षण 31 मार्च 2026 पासून सर्व PRS काउंटरवर आणि आयआरसीटीसी वेबसाइटवर सुरू होणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number