स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांचा  राजीनामा

जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा

 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रवीकांत तुपकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या

 

राजीनाम्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनीही राजीनामा देण्याचं सत्र सुरू केले.

 

स्वाभिमानी संघटनेचे नेते राणा चंद्रशेखर चंदन आणि जिल्हाध्यक्ष भगवानराव मोरे यांनीही शासकीय दुष्काळ निवारण समितीच्या सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला.

 

त्यांनी बुलडाण्याचे पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकरांची यांची भेट घेऊन आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version