जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा
शिवसेना कार्यकर्ते आणि पोलिसात तुफान हाणामारी झाल्याची घटना बुलडाण्यातील नांदुरा परिसरात घडली आहे.
जिल्हाप्रमुखाच्या वाहनाला धक्का लागल्यावरून हा वाद झाल्याचे समजते.
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता पाटील यांच्या वाहनाला ट्रक चालकाने कट मारली. यावेळी शिवसेना कार्यकर्ते आणि ट्रक चालकामध्ये वाद झाला.
या वादात मध्यस्थी करणाऱ्या वाहतूक पोलिसासह कार्यकर्त्यांची बाचाबाची झाली. संतप्त कार्यकर्त्यांनी पोलिसांनाच मारहाण केली.
या प्रकरणी दत्ता पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.