Buldhana: ‘पदाचा राजीनामा दे, अन्यथा तुला संपवू…’; विरोधकांचा सततचा त्रास अन् सरपंचाने उचललं टोकाचं पाऊल

सतत फोन करून पदाचा राजीनामा देण्याची मागणी तसेच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला असल्याचे सांगितले जात आहे.

Buldhana: ‘पदाचा राजीनामा दे, अन्यथा तुला संपवू…’; विरोधकांचा सततचा त्रास अन् सरपंचाने उचललं टोकाचं पाऊल

बुलढाणामधून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.  “पदाचा राजीनामा दे, अन्यथा तुला संपवून टाकू” अशा धमक्यांना कंटाळून संग्रामपूर तालुक्यातील करमोडा गावाचे सरपंच दीपक उगले यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीपक उगले यांनी रात्रीच्या सुमारास स्वतःच्या शेतात आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर आपली व्यथा आणि विवंचना मांडल्याचे समोर आले आहे. सतत फोन करून पदाचा राजीनामा देण्याची मागणी तसेच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला असल्याचे सांगितले जात आहे.

लोकनियुक्त सरपंचावर विरोधकांकडून कथितपणे होत असलेल्या दबावाचा आणि मानसिक त्रासाचा हा गंभीर प्रकार असल्याचे बोलले जात आहे. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर करमोडा गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली.

हेही वाचा – Newlywed Woman Death: महिन्याभरापूर्वी झालेल्या लग्नाचा करुण अंत! 16 व्या मजल्यावरून पडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी वरवट बकाल येथील रुग्णालयात नेण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, आत्महत्येपूर्वी सोशल मीडियावर करण्यात आलेल्या कथित पोस्ट आणि धमकीचे फोन याबाबतही तपास केला जात आहे. दरम्यान, सरपंच दीपक उगले यांच्या आत्महत्येमागे नेमके कोण जबाबदार आहेत आणि त्यांना धमक्या देण्यात आल्या होत्या का, याचा तपास झाल्यानंतरच संपूर्ण प्रकरणाचे वास्तव समोर येणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number