#Budget2020 : निर्मला सीतारामन करणार 2020-21 चा अर्थसंकल्प सादर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील दुसरा अर्थसंकल्प सादर आज सकाळी 11 वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. प्रथम नॉर्थ ब्लॉकमधून त्या राष्ट्रपती भवनात गेल्या. तेथून संसदेत पोहोचल्यावर त्या अर्थसंकल्प सादर करतील. (Union Budget 2020) 2016 पर्यंत फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी अर्थसंकल्प सादर करण्याची प्रथा होती. मात्र माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या प्रथेला […]

#Budget2020 : निर्मला सीतारामन करणार 2020-21 चा अर्थसंकल्प सादर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील दुसरा अर्थसंकल्प सादर आज सकाळी 11 वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. प्रथम नॉर्थ ब्लॉकमधून त्या राष्ट्रपती भवनात गेल्या. तेथून संसदेत पोहोचल्यावर त्या अर्थसंकल्प सादर करतील. (Union Budget 2020)

2016 पर्यंत फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी अर्थसंकल्प सादर करण्याची प्रथा होती. मात्र माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या प्रथेला छेद देत 2017 पासून 1 फेब्रुवारी रोजीच अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी चोपडी पुजनाची परंपरा सुरू केली आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर अर्थमंत्रीपदी वर्णी लागलेल्या दुसऱ्या महिला आहेत.

देशाचा आर्थिक विकास दर (GDP) खाली आला आहे. त्यामुळे मोदी सरकारपुढे मोठं आव्हान आहे. त्यामुळे यंदा बजेटमध्ये ढासळत्या अर्थव्यवस्थेवर काय तोडगा निघणार याकडेही लक्ष आहे. टॅक्स स्लॅब बदलणार का? रेल्वे बजेटमध्ये मुंबईकरांच्या वाट्याला काय येणार? कोणत्या गोष्टी महागणार किंवा स्वस्त होणार हेदेखील या बजेटमध्ये समजेल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number