एकीकडे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी ठरल्यानंतर राजकीय वातावरण कमालीचे तापले असताना यासंदर्भात एक मोठी अपडेट समोर येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील 9 पैकी बंड पुकारलेल्या खासदारांमध्ये दोन खासदारांची पत्रावर सही नसल्याने ऑपरेशन टायगरला ब्रेक लागल्याचे पाहायला मिळत आहे. 6 बंडखोर खासदारांच्या यादीत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांचे देखील नाव आहे.
मात्र संजय दीना पाटील आणि ओमराजे निंबाळकरा यांची यांनी पाठिंब्याच्या पत्रावर सही नसल्यामुळे ऑपरेशन टायगरला तुर्तास ब्रेक लागले आहे. 2029 ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपल्यालाच तिकीट मिळावं असं आश्वासन संजय दिना पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांना भाजप पक्षश्रेष्ठीकडून हवं आहे. मात्र अद्याप भाजपकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही. त्यामुळे या दोन्ही खासदारांनी अजून ही एकनाथ शिंदे यांच्या पत्रावर सही केली नसल्याची सूत्रांची माहिती आहे.
संजय दिना पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांचे दोन्ही मतदारसंघ भाजपचे असल्यानं 2029 साली होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत या दोघांचंही राजकीय भवितव्य धोक्यात येऊ शकतं. ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांच्यासमोर भाजपच्या मिहीर कोटेचा यांचं आवाहन आहे. याचपार्श्वभूमिवर आज रात्रीपर्यंत जर आश्वासन मिळाले नाही तर संजय दिना पाटील उद्या शिवसेना ठाकरे पक्षाच्या बैठकीला जाण्याची शक्यता आहे. यासाठी संजय दिना पाटील उद्या दुपारी मुंबईत परत येण्याची शक्यता आहे.