Viral Video : राहुल गांधींनी दाखवलेल्या ब्राझिलियन मॉडेलचा व्हिडिओ व्हायरल; म्हणाली, ‘काय वेडेपणा आहे’

फॅक्ट-चेकर मोहम्मद जुबैर यांनी तपास केल्यावर धक्कादायक सत्य समोर आले. तो फोटो भारतीय नसून ब्राझिलियन इन्फ्लुएंसर लारिसाचा असल्याचं समोर आलं आहे.
Viral Video : राहुल गांधींनी दाखवलेल्या ब्राझिलियन मॉडेलचा व्हिडिओ व्हायरल; म्हणाली, ‘काय वेडेपणा आहे’

Rahul Gandhi Voter List Controversy: राजकीय आरोप-प्रत्यारोपांदरम्यान राहुल गांधींनी हरियाणातील मतदार यादीतील गैरव्यवहार दाखवताना वापरलेला एक फोटो आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कारण, हा फोटो भारतीय महिलेचा नसून ब्राझिलियन मॉडेल लारिसाचा होता. राहुल गांधींनी अलीकडील पत्रकार परिषदेत हरियाणातील मतदार यादीतील अनियमितता दाखवण्यासाठी काही मतदार ओळखपत्रे दाखवली होती. त्यात एका महिलेचा एकच फोटो अनेक मतदार कार्डांवर वापरल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, फॅक्ट-चेकर मोहम्मद जुबैर यांनी तपास केल्यावर धक्कादायक सत्य समोर आले. तो फोटो भारतीय नसून ब्राझिलियन इन्फ्लुएंसर लारिसाचा होता.

हेही वाचा – No Shave November Reason : सोशल मीडियावर ‘नो शेव्ह नोव्हेंबर’चा ट्रेंड, जाणून घ्या इतिहास आणि कारण

लारिसाची प्रतिक्रिया 

यानंतर लारिसाने स्वतः एक व्हिडिओ प्रसिद्ध करत म्हटले, ‘मला विश्वास बसत नाहीये. हे लोक माझा जुना फोटो वापरत आहेत! त्या वेळी मी 18-20 वर्षांची होते. आता ते मला भारतीय दाखवत आहेत. हा काय वेडेपणा आहे?’ ती पुढे म्हणाली, नमस्कार इंडिया! माझा भारतीय राजकारणाशी काहीही संबंध नाही. मी कधीही भारतात आलेले नाही. मी ब्राझिलियन मॉडेल आहे. मला भारतातील लोक आवडतात.’ हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटिझन्सनी राहुल गांधींवर विनोदी मीम्सचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा – Plane Crash In America: अमेरिकेत भयानक विमान अपघात; 12 जणांचा मृत्यू, पहा व्हायरल व्हिडिओ

निवडणूक आयोगाचा प्रतिसाद

या प्रकरणावर निवडणूक आयोगाने प्रतिक्रिया देताना राहुल गांधींचे आरोप फेटाळून लावले. जर अशा चुका बूथवर दिसल्या असतील, तर काँग्रेसच्या एजंटांनी ताबडतोब आक्षेप नोंदवायला हवा होता. मात्र कोणतीही तक्रार आलेली नाही, असे आयोगाने स्पष्ट केले. दरम्यान, द इंडियन एक्सप्रेसनेही राहुल गांधींच्या दाव्यांची पडताळणी केली आणि अनेक उदाहरणे तथ्यात्मकदृष्ट्या चुकीची असल्याचे उघड केले.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version