चर्चगेट स्थानकात बॉम्ब असल्याचा निनावी फोन

चर्चगेट स्थानकात बॉम्ब असल्याचा निनावी फोन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

चर्चगेट स्थानक बॉम्बने उडवू अशी धमकी देणारा निनावी फोन आल्यानंतर चर्चगेट स्थानकाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाचे पथक स्थानकाच्या परिसरात तैनात करण्यात आले.

 

निनावी फोन आल्यानंतर चर्चगेट स्थानकाची कसून तपासणी करण्यात आली. यावेळी लोकलमध्ये एका बेवारस पिशवीत टेडी बेअर असल्याचं उघड झालं. या घटनेने चर्चगेट स्थानकातील प्रवाशांमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण होते. दरम्यान, आरपीएफच्या हेल्पलाईनवर कुठून फोन आला याचा तपास सुरु आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version