‘महाबीज’कडून बोगस बियाणांचं वाटप

‘महाबीज’कडून बोगस बियाणांचं वाटप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

‘महाबीज’कडूनही बोगस बियाणांचं वाटप करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘महाबीज’कडून देण्यात आलेल्या सोयाबीनच्या बियाणांचं पीक उगवलंच नसल्याची माहिती समोर आली आहे.

‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ योजनेंतर्गत या सोयाबीन बियाणांचं वाटप करण्यात आलं होतं. त्यामुळे आता बियाणंच बोगस, तर शेतकरी समृद्ध कसा होणार? हा सवाल विचारला जात आहे.

 

दरम्यान, महाबीजच्या पोत्यांवर बियाणांची माहिती नाही. त्यामुळे कृषी विभागानं फसवणूक केल्याचा शेतकऱ्याचा आरोप होत आहे. सरकारी बीज निर्मिती कंपनीही शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप केला जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version