BMC Elections: जागा वाटपावरून महायुतीत तिढा? भाजपची 150 जागांची मागणी, शिंदे गटही 100 जागांवर ठाम

मुंबई महापालिकेतील 227 जागांपैकी तब्बल 150 जागांवर उमेदवार उतरवण्याची भाजपने तयारी सुरू केली आहे. महापालिकेत भाजपचाच महापौर बसणार, असा ठाम विश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे.
BMC Elections: जागा वाटपावरून महायुतीत तिढा? भाजपची 150 जागांची मागणी, शिंदे गटही 100 जागांवर ठाम

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला शह देण्यासाठी महायुतीने कंबर कसली आहे. मुंबई महापालिकेत आपलाच महापौर बसवण्यासाठी भाजपने 'मिशन बीएमसी' सुरू केले आहे, तर एकनाथ शिंदे यांचा गटही आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे. पण याचमुळे महायुतीमध्ये जागा वाटपावरून मोठा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.

भाजपची 150 जागांची तयारी
मुंबई महापालिकेतील 227 जागांपैकी तब्बल 150 जागांवर उमेदवार उतरवण्याची भाजपने तयारी सुरू केली आहे. महापालिकेत भाजपचाच महापौर बसणार, असा ठाम विश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे.

शिंदे गटाचा दावा 100 जागांवर
दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनेही आपला दावा ठाम ठेवला आहे. 2017 च्या निवडणुकीत शिवसेनेने (ठाकरे गट) जिंकलेल्या 84 जागा आणि मनसेच्या 7 नगरसेवकांनी प्रवेश केल्यामुळे शिंदे गट एकूण 91 जागांवर हक्क सांगत आहे. या जागा कोणत्याही परिस्थितीत सोडण्यास शिंदे गट तयार नाही. याशिवाय, आणखी काही जागांची मागणी करत शिंदे गटाने एकूण किमान 100 जागांवर दावा ठोकला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा – Metro-3 Aqua Line: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो-3 चा अखेरचा टप्पा दसऱ्याला सुरू होणार; संपूर्ण मार्गावरील 27 स्टेशन जाणून घ्या

जागा वाटपाची गुंतागुंत
महायुतीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन प्रमुख पक्ष आहेत. जर भाजपने 150 जागांवर लढण्याचा आग्रह धरला तर उर्वरित 77 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसला 20 जागा द्याव्या लागतील. अशा परिस्थितीत शिंदे गटाच्या वाट्याला केवळ 57 जागा येतील. एवढ्या कमी जागांवर लढण्यास शिवसेना शिंदे गट तयार नाही.

शिंदे गटाने 100 पेक्षा जास्त जागांवर नगरसेवकांना आपल्याकडे आणले आहे, त्यापैकी 45 नगरसेवक हे मागील निवडणुकीत ठाकरे गटातून निवडून आले होते. अशा स्थितीत शिंदे गटाला 100 जागा दिल्यास भाजपच्या वाट्याला कमी जागा येतील, ज्यामुळे हे समीकरण आणखी गुंतागुंतीचे झाले आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिवसेना यांच्यातील जागा वाटपाचा हा तिढा कसा सुटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – Maharashtra Doctors Strike: 'या' दिवशी राज्यातील 1.8 लाख अ‍ॅलोपॅथिक डॉक्टर संपावर जाणार

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version