जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
पालघरमध्ये 28 मे रोजी लोकसभेसाठी पोटनिवडणूक झाली होती. भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे पालघरमध्ये ही पोटनिवडणूक झाली होती. या निवडणूकीत शिवसेना – भाजपने पालघर पोटनिवडणूकीत प्रतिष्ठेची लढत केल्यामुळे सर्वांचे लक्ष या निकालाकडे लागले होते.
आज या पालघर पोटनिवडणूकीचा निकाल जाहीर झाला असून पालघरमध्ये भाजपचे रवींद्र गवित विजयी झाले असून शिवसेनेचे श्रीनिवास वनगा यांचा पराभव झाला आहे. राजेंद्र गावित पहिल्या फेरीपासूनचं आघाडीवर होते. रवींद्र गवित यांच्या विजयानंतर भाजपमध्ये जल्लोष साजरा केला जात आहे.
पालघर लोकसभा पोटनिवडणूकीच्या अंतिम फेरीचा निकाल :
भाजपा – 2,63,683,
शिवसेना – 2,37,207
बविआ – 2,08,009
काँग्रेस – 46,861
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.