जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये उंदिरांचा सुळसुळाट झाला आहे. त्याच उंदिराचे पडसाद मुंबईच्या पालिकेच्या सभागृहात उमटलेत.
मुंबई महापालिकेच्या महासभेत भाजप नगरसेवक कमलेश यादव यांनी उंदिरासह सभागृहात प्रवेश केला. त्यामुळे महापौरांनी नगरसेवक कमलेश यादव यांना सभागृहाबाहेर जाण्याचे आदेश दिले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.