जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
आगामी विधानसभा निवडणुकीत राज्याची जनता पुन्हा एकदा भाजपला कौल देईल असे भाकीत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वर्तवले आहेत.
इतकंच नाही तर, देवेंद्र फडणवीस सरकार 175 पेक्षा अधिक जागा जिंकून सत्तेत येईल, असा दावाच बावनकुळे यांनी यावेळी केला.
ते नागपूरमध्ये बोलत होते. भाजपने अंतर्गत सर्व्हे केला.या सर्व्हेनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात भाजपची सत्ता येईल असा दावा बावनकुळे यांनी केला. तसेच, राज्यात देवेंद्र फडणवीस सगळ्यात जास्त लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचंही बावनकुळे यावेळी म्हणाले.