BJP आमदाराची महापालिका अधिकाऱ्यास बॅटने मारहाण

आमदार आकाश विजयवर्गीय यांनी महापालिका अधिकाऱ्यास बॅटने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय यांचे पुत्र आमदार आकाश विजयवर्गीय यांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. जुन्या आणि कोसळण्याची शक्यती असणारी घर पाडण्यासाठी आलेल्या महापालिकेच्या पाथकावर हा हल्ला करण्यात आला आहे. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नेमकं काय घडलं? पावसाळा […]

BJP आमदाराची महापालिका अधिकाऱ्यास बॅटने मारहाण

आमदार आकाश विजयवर्गीय यांनी महापालिका अधिकाऱ्यास बॅटने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय यांचे पुत्र आमदार आकाश विजयवर्गीय यांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. जुन्या आणि कोसळण्याची शक्यती असणारी घर पाडण्यासाठी आलेल्या महापालिकेच्या पाथकावर हा हल्ला करण्यात आला आहे. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

नेमकं काय घडलं?

पावसाळा सुरू झाल्याने पालिका प्रशासनाने जुनी घरे पाडण्यासाठीची मोहूीम हाती घेतली आहे.

यामुळे अशी घरे पाडण्यासाठी महापालिकेचे पथक आले असता त्याठिकाणी हा प्रकार घडला आहे.

आकाश विजयवर्गीय आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये जोरदार वाद झाला.

यामध्ये आकाश विजयवर्गीय हे महापालिका अधिकाऱ्यांवर धावून गेले.

त्यानंतर संतापलेल्या आकाश यांनी बॅट घेऊन अधिकाऱ्यांना मारण्यास सुरूवात केली.

दरम्यान मी घटनास्थळी पोहोचलो तेव्हा महापालिका अधिकारी महिलेस ओढून बाहेर काढत होते.

असे आमदार आकाश विजयवर्गीय यांनी म्हटलं आहे.

आकाश  यांच्याबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांनी देखील या अधिकाऱ्यांशी वाद घालत त्यांना मारहाण केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number