Mira Bhayandar : मिरा-भाईंदरमध्ये पुन्हा वादाची ठिणगी; पर्यूषण काळात भाजप आमदाराच्या शाळेत कांदा-लसूणला मनाई

मिरा-भाईंदर : मिरा रोड येथील 'सेवेन स्क्वेअर अकॅडमी' या शाळेत पर्यूषण काळात विद्यार्थ्यांनी डब्यात कांदा, लसूण, बटाटा आणि बीट यांसारखे कंदमूळ पदार्थ आणू नयेत, असे आवाहन शाळेकडून करण्यात आले आहे. या आवाहनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) तीव्र आक्षेप घेतला असून, मुलांनी डब्यात काय खायचे हे ठरवणारी शाळा कोण, असा सवाल उपस्थित केला आहे. भाजपचे आमदार नरेंद्र […]

Mira Bhayandar : मिरा-भाईंदरमध्ये पुन्हा वादाची ठिणगी; पर्यूषण काळात भाजप आमदाराच्या शाळेत कांदा-लसूणला मनाई

मिरा-भाईंदर : मिरा रोड येथील 'सेवेन स्क्वेअर अकॅडमी' या शाळेत पर्यूषण काळात विद्यार्थ्यांनी डब्यात कांदा, लसूण, बटाटा आणि बीट यांसारखे कंदमूळ पदार्थ आणू नयेत, असे आवाहन शाळेकडून करण्यात आले आहे. या आवाहनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) तीव्र आक्षेप घेतला असून, मुलांनी डब्यात काय खायचे हे ठरवणारी शाळा कोण, असा सवाल उपस्थित केला आहे. भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांची ही शाळा असून आत वादाची ठिणगी पडली आहे. मिरा रोड पूर्वेतील सेवेन स्क्वेअर अकॅडमी शाळेच्या पालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर एक मेसेज पाठवण्यात आला होता.

हेही वाचा : Shivsena Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीच्या तयारीला ठाकरेसेनेकडून वेग! 40 मतदारसंघांसाठी संपर्कप्रमुखांची नियुक्ती; कोणत्या नेत्याला कुठली जबाबदारी

या मेसेजमध्ये पर्यूषण पर्वाच्या काळात विद्यार्थ्यांनी कांदा, लसूण, बटाटा व बीट डब्यात न आणण्याची विनंती करण्यात आली होती. तसेच, या काळात शाळेच्या कॅन्टीनमध्येही हे पदार्थ न वापरता खाद्यपदार्थ दिले जातील, असे नमूद करण्यात आले होते. काही पालकांनी हा मेसेज मनसेचे पदाधिकारी सचिन पोपळे यांना दाखवला. त्यानंतर मनसेने यावर आक्रमक पवित्रा घेतला. "मराठी माणसांची मुले आणि विद्यार्थी काय खाणार हे ठरवणारी शाळा कोण?" असा थेट सवाल सचिन पोपळे यांनी केला. ही शाळा स्थानिक भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची असल्याचे सांगत मनसेने पुढे प्रश्न उपस्थित केला की, "उद्या एखाद्या मराठी उद्योजकाने शाळा सुरू केली आणि गटारीच्या वेळी विद्यार्थ्यांना चिकन, मटण किंवा अंडी आणण्यास सांगितले, तर ते शाळा प्रशासनाला मान्य होईल का?" असा सवाल त्यांनी केला.

दरम्यान, आमदार नरेंद्र मेहता यांनी शाळेतर्फे कोणतीही सक्ती करण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट केले. "पर्यूषण हा अत्यंत पवित्र काळ आहे. या काळात प्राणी आणि पशूंवर अन्याय होऊ नये, त्यांची कत्तल होऊ नये या सद्भावनेने पालकांना केवळ एक विनंती करण्यात आली होती. व्हॉट्सॲप ग्रुपवरील मेसेजमध्येही सक्तीचा कोणताही उल्लेख नाही. यामागे कोणताही चुकीचा उद्देश नसून कोणीही या विषयावर राजकारण करू नये," असे आवाहन त्यांनी केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number