‘ग्रामपंचायत मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधीत्व करते’ – किरीट सोमय्या

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. अलिबागमधील कोर्लई गावात रश्मी ठाकरे यांनी १९ बंगल्यांचे कर भरला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. याच पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या कोर्लई […]

‘ग्रामपंचायत मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधीत्व करते’ – किरीट सोमय्या

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. अलिबागमधील कोर्लई गावात रश्मी ठाकरे यांनी १९ बंगल्यांचे कर भरला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. याच पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या कोर्लई गावात जाऊन बंगल्याची पाहणी करणार आहे.

कोर्लई गावात किरीट सोमय्या म्हणाले, कोर्लई ग्रामपंचायतीमध्ये आमची भेट झाली. मात्र, मुख्यमंत्री खरे की पत्नी रश्मी ठाकरे याची स्पष्टता ग्रामपंचायत करू शकली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत उद्धव ठाकरेंचे प्रतिनिधीत्व करत आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे सांगतात की, माझे बंगले आहेतत त्यामुळे खरे कोण आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, ग्रामसेवकांशी भेट झाली असल्याची माहिती किरीट सोमय्यांन दिली आहे.

किरीट सोमय्या सरपंचाची भेट घेण्यास कार्यालयात गेले असता, तेथे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे तेथे तणावाचे वातावरण होते.

किरीट सोमय्यांचे स्वागत करण्यासाठी कार्यकर्ते कोर्लईत दाखल झाले आहेत. तर किरीट सोमय्या कोर्लईत दाखल होताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर सोमय्यांच्यासोबत सुरक्षा रक्षकांचा ताफा आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number