Bhuleshwarcha Raja : "मूर्ती पुन्हा कारखान्यात आणली, मूर्तीचे वेल्डिंग तुटलेले आणि 150 मीटरवर…" भुलेश्वरच्या राजाची मूर्ती का कोसळली? मूर्तीकाराने केला मोठा खुलासा

भुलेश्वरचा राजा मूर्ती कोसळल्याच्या प्रकरणात एक मोठा आणि महत्त्वाचा खुलासा झाला आहे. भुलेश्वरच्या गणपतीची 22 फूट उंच मूर्ती भायखळ्यातील अनिकेत देसाई यांच्या कार्यशाळेतून भुलेश्वरला नेण्यात येत होती.

Bhuleshwarcha Raja : &quotमूर्ती पुन्हा कारखान्यात आणली, मूर्तीचे वेल्डिंग तुटलेले आणि 150 मीटरवर…&quot भुलेश्वरच्या राजाची मूर्ती का कोसळली? मूर्तीकाराने केला मोठा खुलासा

मुंबईतील भुलेश्वर परिसरात गणेशोत्सवाच्या तयारीदरम्यान घडलेल्या दुर्घटनेने गणेशभक्तांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गणेशमूर्तीच्या आगमन मिरवणुकीदरम्यान मूर्ती कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीररित्या जखमी झाले. या घटनेमुळे भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळावर शोककळा पसरली आहे. गणेशोत्सवाच्या उत्साहात घडलेल्या या घटनेने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. अशातच भुलेश्वरमध्ये गणेश मूर्तीच्या आगमनादरम्यान भुलेश्वरचा राजा मूर्ती कोसळल्याच्या प्रकरणात एक मोठा आणि महत्त्वाचा खुलासा झाला आहे. भुलेश्वरच्या गणपतीची 22 फूट उंच मूर्ती भायखळ्यातील अनिकेत देसाई यांच्या कार्यशाळेतून भुलेश्वरला नेण्यात येत होती.

हेही वाचा- Mumbai Mazgaon : बाप्पाच्या आगमनावेळी मुंबईत दोन गटात राडा! मूर्तीवर अंडी फेकली? नेमकं प्रकरण काय?

दरम्यान मुंबई पोलिसानी मूर्तिकार अनिकेत देसाई यांचा जबाब नोंदवला आहे. अनिकेत देसाई यांच्या जबाबात मुंबई पोलिसांसमोर महत्वाची माहिती आली आहे. मंडपापासून 50-60 मीटर अंतरावर असताना भुलेश्वरच्या गणपतीची मूर्ती कोसळल्याची घटना घडली. आगमन सोहळ्यासाठी मूर्ती कारखान्यातून बाहेर पडताच 150 मीटरवर मूर्तीच्या पाठीमागचे वेल्डिंग तुटले होते अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच मूर्ती 150 मीटर अंतरावरून पुन्हा कारखान्यात आणण्यात आली आणि वेल्डिंग करण्यात आले होते. असा जबाबा देत मूर्तिकार अनिकेत देसाई यांनी महत्त्वाची माहिती दिली. त्यानंतर मूर्ती पुन्हा कारखान्यातून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नेली. मूर्तीचे वेल्डिंग तुटल्यामुळे तोल गेल्याने मूर्ती कोसळल्याच आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे. एल टी मार्ग पोलिसांनी मूर्तिकार अनिकेत देसाई यांचा जबाब नोंदवला आहे.

इतर गणेश मंडळांकडून भुलेश्वरच्या गणेश मंडळासाठी मदतीचा हात पुढे
या दुर्दैवी घटनेनंतर मदतीचा हात पुढे करत मुंबईतील इतर गणेश मंडळांनी भुलेश्वरचा राजा या गणेश मंडळाला मदतीचा हात पुढे केला आहे. यावेळी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने भुलेश्वरचा राजा मंडळाला आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. भुलेश्वरच्या राजा गणेशोत्सव मंडळाला 11 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. या दुर्घटनेत जीव गमावलेल्या दोन्ही व्यक्तींच्या कुटुंबीयांनाही आर्थिक मदत दिली जाणार आहे. प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी ही मदत जाहीर केली. तसेच या अपघातामुळे मंडळ मोठ्या संकटात सापडले होते. या कठीण प्रसंगात गणेशगल्लीच्या ‘मुंबईचा राजा’ मंडळाने पुढाकार घेत संकटात सापडलेल्या भुलेश्वरच्या राजा मंडळाला 3 लाखांची आर्थिक मदत जाहीर केली असल्याची माहिती मिळत आहे. 

हेही वाचा- BMC Decision After Bhuleshwar Incident : बाप्पाच्या मिरवणुकीसाठी सुरक्षा प्रमाणपत्र गरजेचं; भुलेश्वर गणेश दुर्घटनेनंतर पालिकेचा निर्णय

नेमकी घटना काय?
शनिवारी 22 ऑगस्ट रोजी रात्री 9 च्या सुमारास मुंबईतील भुलेश्वरचा राजा आपल्या मंडपात विराजमान होण्यापूर्वीच गणपतीची 22 फूट उंच मूर्तीचा तोल जाऊन मूर्ती कोसळली. यात पाच जण जखमी झाले असून दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. यंदा भुलेश्वर राजा सार्वजनिक गणेश मंडळाचे हे 63 वे वर्ष आहे. भुलेश्वरच्या गणपतीची 22 फूट उंच मूर्ती भायखळ्यातील अनिकेत देसाई यांच्या कार्यशाळेतून भुलेश्वरला नेण्यात येत होती. यादरम्यान मंडपापासून 50-60 मीटर अंतरावर अचानक मूर्ती कोसळल्याची घटना घडली आहे.

या ठिकाणी रस्त्यावर कोणतेही खड्डे दिसत नसून प्राथमिक तपासानुसार, तोल गेल्यामुळे ही घटना घडली असावी असे म्हटले जात आहे. या दुर्घटनेत मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवशे आणि पदाधिकारी बृजेश जोशी हे दोघे ठार झाले असून, अन्य पाच जण जखमी आहेत. मंडपापासून काही अंतरावर असतानच ज्या क्रेनवर या 22 फूट उंच मूर्तीचा भार तोलून धरला होता ती क्रेन कमजोर निघाली आणि क्रेनमधून निसटलेली राजाची मूर्ती सरळ खाली कोसळली. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुलेश्वरमधील समुद्रीमाता मंदिराजवळ हा प्रकार घडला. आता भुलेश्वर राजाची भंगलेली मूर्ती विसर्जित केली जाईल आणि मग प्राथमिक तपास करून गुन्हे दाखल कले जातील, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number