जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
भाईंदरच्या उत्तनजवळील पाली गावात एका बंद घरात खड्डा खोदण्यात आल्यामुळे जादू-टोण्याचा संशय व्यक्त केला जातोय.
घराच्या मालकिणीच्या तक्रारीवरून उत्तन पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलीये.
मात्र, खड्ड्याजवळ कोणतंही पूजेचं सामान आढळलेलं नाहिये. हा खड्डा कोणी खणलाय तपास पोलीस सध्या करतायत.
या घराची मालकिण वलीना पटेल या कुर्ला येथे राहत असून विकेंडला राहण्यासाठी आल्यानंतर घरात त्यांना खड्डा आढळला. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली. घरात काहीतरी आगळंवेगळं घडण्याचा संशय वलीना पटेल यांनी यावेळी व्यक्त केलाय.