Bhimashankar Temple : भाविकांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ दिवसापासून भीमाशंकर मंदिर 3 महिन्यांसाठी बंद; नेमकं कारण काय?

मंदिराच्या विशेष विकास आराखड्यातील कामांची गती आणि भाविकांची सुरक्षा लक्षात घेऊन श्री क्षेत्र भीमाशंकर संस्थानने हा मोठा निर्णय घेतला आहे.
Bhimashankar Temple : भाविकांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ दिवसापासून भीमाशंकर मंदिर 3 महिन्यांसाठी बंद; नेमकं कारण काय?

Bhimashankar Temple : 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथील मंदिर 9 जानेवारी 2026 पासून पुढील 3 महिन्यांसाठी दर्शनाकरिता बंद राहणार आहे. मंदिराच्या विशेष विकास आराखड्यातील कामांची गती आणि भाविकांची सुरक्षा लक्षात घेऊन श्री क्षेत्र भीमाशंकर संस्थानने हा मोठा निर्णय घेतला आहे. या काळात मंदिरातील सभामंडप आणि पायरी मार्गाचे महत्त्वाचे बांधकाम केले जाणार आहे.

हेही वाचा – Pune Election 2026: कुख्यात गुंड बंडू आंदेकर निवडणुकीच्या रिंगणात, सत्ताधारी पक्षाकडून तिकीट; नव्या वादाला ठिणगी

महाशिवरात्रीला दर्शन खुले राहणार

मंदिर 3 महिने बंद असले तरी, भाविकांच्या श्रद्धेचा विचार करून महाशिवरात्रीच्या कालावधीत (12 ते 18 फेब्रुवारी 2026) हे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. या काळात भाविकांना नियमानुसार दर्शन घेता येईल. मात्र, हा काळ वगळता उर्वरित 3 महिने मंदिर परिसरात भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही.

नित्य पूजाअर्चा सुरूच राहणार

मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी बंद असले तरी, भीमाशंकरची परंपरा खंडित होणार नाही. देवाचे धार्मिक विधी, नित्य पूजा आणि अभिषेक परंपरेनुसार आणि नियोजित वेळेत सुरूच राहतील. केवळ अधिकृत कर्मचारी, बांधकाम यंत्रणा आणि स्थानिक ग्रामस्थ वगळता इतरांना परिसरात प्रवेश बंदी असेल.

हेही वाचा – Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात थंडीची 'सेकंड इनिंग' सुरू; उत्तर भारतातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे 'या' तीन जिल्ह्यांचा पारा डायरेक्ट पाच अंशांवर जाणार?

कुंभमेळ्याच्या तयारीसाठी मोठा निर्णय

2027 मध्ये होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रयागराज महाकुंभाचा अनुभव पाहता, सिंहस्थ कुंभमेळ्यावेळी भीमाशंकरमध्ये लाखो भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी भाविकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, सुरक्षित प्रवेश आणि गर्दी नियंत्रण व्यवस्था पूर्ण करणे हे प्रशासनाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी स्पष्ट केले. प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाला भाविकांनी आणि स्थानिक नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version