जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संघटक प्रमुख संभाजी भिडे यांचा जाहीर कार्यक्रम येत्या रविवारी मुंबईत लालबागमध्ये होणार आहे. हा कार्यक्रम रद्द करण्यात यावा अशी मागणी भीम आर्मीचे महाराष्ट्र अध्यक्ष अशोक कांबळे यांनी केलीय.
संभाजी भिडे यांचा जाहीर भाषण झालं तर सामाजीक सलोखा बिघडू शकतो त्यामुळे त्यांचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी भीम आर्मीने केलीय.
या संदर्भात त्यांनी निवेदन पत्र मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र पोलिस अहासंचालकांना दिलंय. पोलिसांनी हा कार्यक्रम रद्द नाही केला तर, भीम आर्मी हा कार्यक्रम उधळून लावेल असा इशरा भीम आर्मीने दिलांय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.