बापरे! आता मुंबईकरांचा बेस्ट बसचा प्रवास आणखी महागणार

बापरे! आता मुंबईकरांचा बेस्ट बसचा प्रवास आणखी महागणार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

आधीच महागाईची झळ सोसत असलेल्या मुंबईकरांचा बेस्ट प्रवासही महागणार आहे.

बेस्टच्या 2018-19च्या अर्थसंकल्पात दरवाढीचा प्रस्ताव आहे.  तो मंजूर झाल्यास येत्या आर्थिक वर्षापासून बेस्टचा प्रवास महागण्याची शक्यता आहे.

4 किलोमीटरच्या पुढील प्रवासासाठी तिकीट दर वाढवण्याचं प्रस्तावित आहे. बेस्ट प्रवासाकरिता 1 ते 12 रुपये तिकीट आणि मासिक पाससाठी 40 ते 350 रुपये जादा मोजावे लागण्याची शक्यता आहे.

आर्थिक डबघाईला आलेल्या बेस्टला तारण्यासाठी बेस्टनं प्रवाशांच्या खिशाला कात्री लावण्याचा निर्णय घेतला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version