जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
बेस्टच्या कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. बेस्टच्या खात्याच्या कार्यपद्धतीत बदल होणार आहे. एस्क्रो म्हणजेच बेस्टच्या बँक खात्याच्या पद्धतीत बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत हा निर्णय घेण्यात आला असून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कर्मचाऱ्यांचा पगार एस्कोच्या खात्यात जमा होणार आहे. बेस्टचा पगार हा वेळेवर व्हावा यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.