…म्हणून बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप पुढे ढकलला

…म्हणून बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप पुढे ढकलला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

बुधवारी मध्यरात्रीपासून  संपावर जाणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी संप पुढे ढकललाय. बेस्टचे जवळपास 35 हजार कामगार संपावर जाणार होते.

औद्योगिक न्यायालयाने बेस्ट कामगार कृती समितीस संप न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. खासगी गाड्या सुरु करण्याबाब बेस्ट कामगार संघटनांनी याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर 5 मार्चला अंतिम सुनावणी होणाराय. त्यामुळे 5 मार्चपर्यंत बेस्ट कामगार कृती समिती आता संप करणार नाहीत.

मात्र, जर खासगी गाड्या बेस्ट मध्ये चालवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी झाली तर मात्र संप होणारच असं संघटनांनी म्हंटलय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version