Beed: बीडच्या माजी सरपंचाचा मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

बीड जिल्ह्यातील विविध घटना आपण सातत्याने बघत आहोत. त्यातच आता बीडच्या माजी  सरपंचाने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. संजय खोटे यांनी मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.

Beed: बीडच्या माजी सरपंचाचा मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

बीड : बीड जिल्ह्यातील विविध घटना आपण सातत्याने बघत आहोत. त्यातच आता बीडच्या माजी  सरपंचाने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. संजय खोटे यांनी मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा समोर आले आहे. 

बीड जिल्ह्यातील माजी सरपंचाने मंत्रालयासमोर अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न आहे. पोलिसांनी वेळीच पकडल्याने मोठा अनर्थ टळला आहे. रोजगार हमी योजनेतील कामाची चौकशी करा व दोषीवर गुन्हे दाखल करा या मागणीसाठी माजी सरपंच संजय खोटे यांनी टोकाचे पाऊल  उचलले आहे. पाटोदा तालुक्यातील मुगगाव ग्रामपंचायतमध्ये रोजगार हमी योजनेमध्ये घोटाळा केल्याचा त्यांनी आरोप आहे. तसेच घोटाळेबाजांना अधिकारी पाठीशी घालत आहेत असा आरोपही त्यांच्याकडून करण्यात येत आहे. 

हेही वाचा : महिला आयोगाकडून बीडमधील महिला वकील मारहाण प्रकरणाची दखल

बीडमधील माजी सरपंचाने स्वत:ला पेटवण्याचा प्रयत्न केला आहे. वेळीच पोलिसांनी पकडल्याने मोठा अनर्थ टळला आहे. रोजगार हमी योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप माजी सरपंच संजय खोटे यांनी केला आहे. तसेच दोषींवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number