जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
6 मार्च ते 18 मार्च या कालावधीत श्रीलंकेतल्या 20-20 मालिकेचं आयोजन करण्यात आलं आहे. विराट आणि धोनीसह, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमरा, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, यांच्यासारख्या प्रमुख गोलंदाजांना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. भारत आणि श्रीलंका संघांसह या मालिकेत बांगलादेशचा समावेश आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय गोलंदाजांवर आलेला ताण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. विराटच्या अनुपस्थितीत भारतीय संघाच्या नेतृत्त्वाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.