वृत्तसंस्था, उत्तराखंड
चिनी सैन्याने भारतात घुसखोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. चिनी सैन्याने उत्तराखंडातील बाराहोटीमध्ये मागील आठवड्यात घुसखोरी केली होती.
विशेष म्हणजे चिनी सैन्य सीमा ओलांडून थेट 1 किलोमीटर आत शिरले होते. 25 जुलैला सकाळी 9 वाजता चिनी सैन्याने घुसखोरी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भारत आणि चीनमध्ये डोक्लाम प्रश्नावरुन प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर चिनी सैन्याने भारतात घुसखोरी केल्याची माहिती समोर आली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.