Bail Pola 2026: बैलपोळा आणि तान्हा पोळा म्हणजे काय? जाणून घ्या बैलपोळा सणाची मुख्य विधी, नैवेद्य…

वर्षभर शेतीच्या कामात अविरत कष्ट घेणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उद्याचा दिवस विशेष मानला जातो. या दिवशी शेतकरी आपल्या बैलांची विधिवत पूजा करून त्यांना गोडधोड खाऊ घालतात. यादिवशी

Bail Pola 2026: बैलपोळा आणि तान्हा पोळा म्हणजे काय? जाणून घ्या बैलपोळा सणाची मुख्य विधी, नैवेद्य…

वर्षभर शेतीच्या कामात अविरत कष्ट घेणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उद्याचा दिवस विशेष मानला जातो. या दिवशी शेतकरी आपल्या बैलांची विधिवत पूजा करून त्यांना गोडधोड खाऊ घालतात. यादिवशी बैलांकडून कोणतेही काम करून घेतले जात नाही, उलट त्यांना आकर्षकरित्या सजवून त्यांची गावातून मिरवणूक काढली जाते. कुटुंबातील सदस्य बैलांना गोड नैवेद्य अर्पण करून त्यांचे पूजन करतात. या दिवसाला पिठोरी अमावस्या असेही म्हटले जाते. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांत आजही या सणाला विशेष महत्त्व असून, गावागावांत बैलांना सजवून त्यांची पूजा केली जाते.

बैल पोळाच्या दिवशी काय केले जाते?
पोळ्याच्या दिवशी बैलांना शेतीच्या कामातून सुट्टी दिली जाते. त्यांना स्वच्छ आंघोळ घालून सजवले जाते. त्यांच्या शिंगांना रंग लावला जातो, गळ्यात घंटा आणि फुलांच्या माळा घातल्या जातात. काही ठिकाणी बैलांना आकर्षक वस्त्र आणि सजावटीचे साहित्यही लावले जाते. यानंतर घरातील महिला आणि शेतकरी बैलांची पूजा करतात. त्यांना पुरणपोळी, गोडधोड पदार्थ आणि विविध नैवेद्य दाखवला जातो. बैलांची आरती करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.

हेही वाचा – Kurla Premnagar Maharaja Ganesh Idol Collapse: मुंबईत अघटित घटना! गणेशमूर्ती आगमनादरम्यान कोसळली; मंडळातील 2 कार्यकर्ते…बैलपोळा सणाचे मुख्य विधी आणि परंपरा:

स्नान व सजावट: पोळ्याच्या दिवशी बैलांना नदीवर किंवा ओढ्यात नेऊन स्वच्छ आंघोळ घातली जाते. त्यांच्या शिंगांना रंग-रंगोटी केली जाते, बाशिंग बांधले जाते आणि पाठीवर नक्षीकाम केलेली झूल व पायात तोडे घालून त्यांना छान सजवले जाते.

खांदा शेकणे: बैलांच्या खांद्यांना हळद आणि तुपाने (किंवा तेलाने) शेकले जाते, जेणेकरून वर्षभराच्या कष्टाचा व श्रमाचा थकवा कमी होईल.

नैवेद्य: या दिवशी बैलांना पुरणपोळीचा गोड नैवेद्य प्रेमाने खाऊ घातला जातो.
 
मिरवणूक: संध्याकाळी गावामध्ये वाजत-गाजत सजवलेल्या बैलांची मिरवणूक काढली जाते आणि (पोळ्याची गीते) गायली जातात.
 
पूजा व औक्षण: घरी आणल्यानंतर महिला सडा-रांगोळी काढून बैलांचे स्वागत करतात, त्यांचे पाय धुतात आणि हळद-कुंकू व अक्षता वाहून औक्षण करतात.

बैल पोळा सणाचे महत्त्व
शेतकऱ्याच्या जीवनात बैलांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. पूर्वीपासून शेतीची नांगरणी, पेरणी आणि इतर अनेक कामांसाठी बैलांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. त्यामुळे बैल पोळा हा शेतकऱ्याच्या जीवनातील अविभाज्य घटक असलेल्या पशुधनाचा सन्मान करण्याचा दिवस मानला जातो.

तान्हा पोळा म्हणजे काय?
बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा असतो. हा फक्त मुलांसाठी असतो. नागपुरात याची सुरुवात 1789 साली राजे रघुजी भोसले यांनी केली होती. लहान मुलं लाकडी बैल सजवून मिरवणूक काढतात, जेणेकरून लहानपणापासूनच मुलांना शेतीची किंमत कळावी.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number