Bail Pola 2026 : आज आहे सण पोळा, सर्जा राजाला ओवाळा! बैल पोळ्यानिमित्त आपल्या प्रियजनांना द्या ‘या’प्रेमळ शुभेच्छा

यंदाच्या बैल पोळ्याच्या पावन पर्वानिमित्त आपल्या कुटुंबीय, मित्रपरिवार आणि प्रियजनांना या प्रेमळ शुभेच्छा देऊन हा सण अधिक खास बनवा.

Bail Pola 2026 : आज आहे सण पोळा, सर्जा राजाला ओवाळा! बैल पोळ्यानिमित्त आपल्या प्रियजनांना द्या ‘या’प्रेमळ शुभेच्छा

बळीराजासोबत अहोरात्र आपला घाम गाळणारा, राज्यातील प्रत्येकाच्या तोडात सुखाचा घास जावा यासाठी आपल्या खांद्यावर नांगराचा भार उचलणारा आणि बळीराजाच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा 'बैल पोळा' सण यंदा गुरुवार, 10 सप्टेंबर 2026 रोजी साजरा केला जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी हा दिवस केवळ परंपरा आणि उत्सवाचा नसून, शेतीच्या कामात मोलाची साथ देणाऱ्या बैलांप्रती प्रेम, कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्याचा दिवस आहे. या दिवशी बैलांना शेतीच्या कामातून विश्रांती देत त्यांना सजवले जाते आणि मोठ्या उत्साहात त्यांची पूजा केली जाते.

बैल पोळ्याच्या निमित्ताने बैलांना आंघोळ घालून रंगीबेरंगी सजावट केली जाते. त्यांच्या शिंगांना रंग लावले जातात, गळ्यात घुंगरांच्या माळा घातल्या जातात आणि आकर्षक झुलीने त्यांना सजवले जाते. त्यानंतर विधिवत पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो. ‘सर्जा-राजा’च्या सन्मानाचा हा सोहळा महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनातील नातं, संस्कृती आणि शेतीशी जोडलेली परंपरा अधोरेखित करतो. याचपार्श्वभूमीवर यंदाच्या बैल पोळ्याच्या पावन पर्वानिमित्त आपल्या कुटुंबीय, मित्रपरिवार आणि प्रियजनांना या प्रेमळ शुभेच्छा देऊन हा सण अधिक खास बनवा.

सण आला आनंदाचा,
माझ्या सर्जा राजाचा!
ऋण त्याचे माझ्या माथी,
सण गावच्या मातीचा
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

बैल आमचा शेतकरी मित्र,
शेतीचा खरा आधार
पोळा सणानिमित्त प्रेम अपार!
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

कष्टाशिवाय मातीला आणि 
बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही,
शेतीचा आधारस्तंभ, आमचा सर्जा-राजा…
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

आजचा दिवस कृतज्ञतेचा, 
बळीराजाच्या जीवलगाचा,
बैलांप्रति प्रेम आणि आदर व्यक्त करण्याचा हा दिवस
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

आज आहे सण पोळा, 
सर्जा राजाला ओवाळा! 
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number