एमआयएम वंचित बहुजन आघाडीत…

भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या बहुजन वंचित आघाडीमध्ये एमआयएम सहभागी होणार आहे. सोबत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढण्यासाठीही चर्चा सुरु आहेत. यासाठी औरंगाबादमध्ये २ ऑक्टोबर रोजी बहुजन वंचित आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला या नव्या आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दिन ओवैसी उपस्थित राहणार […]

एमआयएम वंचित बहुजन आघाडीत…

भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या बहुजन वंचित आघाडीमध्ये एमआयएम सहभागी होणार आहे. सोबत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढण्यासाठीही चर्चा सुरु आहेत. यासाठी औरंगाबादमध्ये २ ऑक्टोबर रोजी बहुजन वंचित आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीला या नव्या आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दिन ओवैसी उपस्थित राहणार आहेत.

गेल्या ७० वर्षांपासून वंचित बहुजनांचा वापर करून सत्ता काबीज करणाऱ्या आणि अन्याय करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी समविचारी पक्ष आणि संघटनाना निमंत्रित करण्यात आल्याचं एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी सांगितलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number