Baba Vanga Gold Price Prediction 2026 : भारतीय लोकांसाठी सोने हा केवळ एक धातू नसून ते प्रतिष्ठा आणि सुरक्षित गुंतवणुकीचे प्रतीक मानले जाते. गेल्या एका वर्षात सोन्याच्या किमतीत सुमारे 80 टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याने आधीच सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. सध्या जागतिक बाजारपेठेत इराण-अमेरिका युद्धासारख्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात सतत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अशातच 'बाल्कन नॉस्ट्राडॅमस' (Balkan Nostradamus) म्हणून प्रसिद्ध असलेल्या बाबा वेंगा यांची 2026 सालासाठीची भविष्यवाणी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, यामुळे मध्यमवर्गीयांच्या चिंतेत भर पडली आहे. कारण, याआधी बाबा वेंगा यांच्या अनेक भविष्यवाणी खऱ्या झाल्या आहेत. या वेळेस तर, अस्थिर जागतिक परिस्थितीमुळे बाजारातील तज्ज्ञ आणि विश्लेषकही अशाच प्रकारचा इशारा देत आहेत.
बाबा वेंगा यांची 2026 मधील आर्थिक संकटाची भविष्यवाणी
बाबा वेंगा यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, 2026 हे वर्ष जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत कठीण असणार आहे. त्यांच्या भविष्यवाणीतील काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेऊ..
– बँकिंग व्यवस्था: या वर्षी जगातील मोठी बँकिंग यंत्रणा कोलमडून पडण्याची शक्यता आहे.
– कागदी चलन: लोकांचा कागदी चलनावरचा विश्वास उडून ते पुन्हा एकदा सोन्यासारख्या भौतिक संपत्तीकडे वळतील.
– किमतीत वाढ: आर्थिक अस्थिरतेमुळे सोन्याच्या दरात 25 ते 40 टक्क्यांची प्रचंड वाढ होऊ शकते.
– विक्रमी दर: जर हे भाकीत खरे ठरले, तर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1.9 लाख ते 2.1 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.
गुंतवणूकदारांची सुरक्षित आश्रयाकडे धाव
जेव्हा जगात युद्धासारखी परिस्थिती किंवा राजकीय अस्थिरता निर्माण होते, तेव्हा गुंतवणूकदार शेअर बाजारापेक्षा सोन्याला अधिक पसंती देतात. मध्य पूर्वेतील सध्याचा तणाव ही दरवाढीला खतपाणी घालणारी मुख्य बाब ठरत आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम असल्याने सोन्याची मागणी वाढलेली आहे. पण जर भाव 2 लाख रुपयांच्या पुढे गेले, तर दक्षिण भारतासारख्या सोन्याचा सर्वाधिक वापर करणाऱ्या भागात मोठा धक्का बसू शकतो. विश्लेषकांच्या मते, कागदी चलनाची किंमत कमी होणे हे सोन्याचा भाव गगनाला भिडण्याचे प्रमुख कारण ठरेल.
बाजार तज्ज्ञांचे विश्लेषण आणि सावधगिरीचा इशारा
केवळ भविष्यवाण्यांवर विश्वास न ठेवता बाजारातील तांत्रिक बाबींकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे कमोडिटी तज्ज्ञ सांगतात. सोन्याच्या किमती काही घटकांवर अवलंबून असतात. ते घटक कोणते आहेत, ते जाणून घेऊ..
– अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे (Federal Reserve) धोरणात्मक निर्णय.
– भारतीय रुपयाचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अवमूल्यन.
– वाढती महागाई आणि युद्धाचा पुरवठा साखळीवर होणारा परिणाम.
तज्ज्ञांच्या मते, सोन्यात मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी सध्याच्या बाजाराचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. मंदीच्या काळात टप्प्याटप्प्याने केलेली खरेदी भविष्यात अधिक फायदेशीर ठरू शकते.
भविष्यवाणी खरी ठरली तर काय होईल?
बाबा वेंगा यांचे अनेक अंदाज यापूर्वी खरे ठरले आहेत, त्यामुळेच जगभरातील लोक या इशाऱ्याकडे गांभीर्याने पाहत आहेत. अनेक देशांमध्ये आधीच आर्थिक मंदीची चिन्हे दिसू लागली असून, बँकांवरील विश्वास कमी झाल्यास लोक सोन्याचा साठा वाढवतील. जर सोन्याचा भाव खरोखरच 2026 मध्ये 2 लाखांचा टप्पा ओलांडला, तर सामान्य माणसासाठी सोने खरेदी करणे हे केवळ एक स्वप्न उरेल. युद्ध थांबल्यास किमतीत तात्पुरती घसरण होऊ शकते, परंतु दीर्घकालीन विचार करता सोन्याचा आलेख वरच्या दिशेनेच राहण्याचे संकेत मिळत आहेत.
(Disclaimer : यामध्ये देण्यात आलेली बाबा वेंगाची ही भविष्यवाणी उपलब्ध स्रोतांवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. जय महाराष्ट्र या भविष्यवाण्यांचा दावा करत नाही किंवा हमी देत नाही.)
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.