धक्कादायक! JNU च्या विद्यार्थिनींसमोर रिक्षाचालकाचं हस्तैथुन

देशाची राजधानी दिल्ली ही गेल्या काही काळापासून स्त्रियांसाठी असुरक्षित होत असल्याचं दिसून आलंय. छेडछाडीचे प्रकार आणि काही निर्भया कांडासारख्या बलात्काराच्या घटनांनी देश हादरून सोडला. तरीही अद्याप स्त्रिया दिल्लीत सुरक्षित नसल्याचाच प्रत्यय वारंवार आलाय. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (JNU) तीन विद्यार्थिनींना एका अश्लील प्रसंगाचा सामना करावा लागलाय. मुलींसमोर हस्तमैथुन! साम्यवादींचा (Communism) पाठीराखा असणारी JNU गेल्या काही […]

धक्कादायक! JNU च्या विद्यार्थिनींसमोर रिक्षाचालकाचं हस्तैथुन

देशाची राजधानी दिल्ली ही गेल्या काही काळापासून स्त्रियांसाठी असुरक्षित होत असल्याचं दिसून आलंय. छेडछाडीचे प्रकार आणि काही निर्भया कांडासारख्या बलात्काराच्या घटनांनी देश हादरून सोडला. तरीही अद्याप स्त्रिया दिल्लीत सुरक्षित नसल्याचाच प्रत्यय वारंवार आलाय. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (JNU) तीन विद्यार्थिनींना एका अश्लील प्रसंगाचा सामना करावा लागलाय.

मुलींसमोर हस्तमैथुन!

साम्यवादींचा (Communism) पाठीराखा असणारी JNU गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चर्चेत आहे.

याच JNU मधील 3 विद्यार्थिनींसमोर विद्यापीठाबाहेर एका विकृत रिक्षाचालकाने हस्तमैथुन केल्याची घटना घडली आहे.

17 सप्टेंबर रोडी रात्री 10 च्या सुमारास विद्यार्थिनींना (students) या किळसवाण्या प्रकाराचा सामना करावा लागला.

तिन्ही विद्यार्थिनी रात्री hostel वर परतत होत्या.

त्यावेळी university च्या गेटवर उभ्या असताना त्यांच्यासमोर  आरोपी रिक्षावाल्याने त्यांच्याकडे पाहात हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली.

या प्रकारानंतर धक्का बसलेल्या विद्य़ार्थिनींनी आरडाओरडा केला.

तेव्हा विद्यापीठाच्या सुरक्षारक्षकांनी आरोपी रिक्षाटचालकाला पकडलं.

विद्यार्थिनींनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

दिल्ली पोलीस ताबडतोब घटनास्थळी पोहोचले आणि त्वरित आरोपी रिक्षाचालकाला अटक केली.

आरोपी रिक्षाचालकाचं नाव अखिलेश कुमार असून तो 27 वर्षांचा आहे.  हा आरोपी मूळचा उत्तर प्रदेशातील कनौज येथील आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number