Marathi Language Rule : रिक्षा-टॅक्सी चालकांनो, मराठी येतेय ना? आजपासून मराठी बोलता येणं बंधनकारक; नियम न पाळल्यास परवान्यावर कारवाई

राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान असणे अनिवार्य असून, या नियमाची अंमलबजावणी ऑगस्टपासून करण्यात येणार आहे.

Marathi Language Rule : रिक्षा-टॅक्सी चालकांनो, मराठी येतेय ना? आजपासून मराठी बोलता येणं बंधनकारक; नियम न पाळल्यास परवान्यावर कारवाई

राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान असणे अनिवार्य असून, या नियमाची अंमलबजावणी ऑगस्टपासून करण्यात येणार आहे. मराठीचे व्यावहारिक ज्ञान नसलेल्या चालकांना प्रथम एक महिन्याची नोटीस देण्यात येईल. या कालावधीत मराठीचे ज्ञान प्राप्त न केल्यास त्यांचा बॅज तीन महिन्यांपर्यंत निलंबित करण्यात येईल. त्यानंतरही मराठी शिकण्यास जाणीवपूर्वक नकार दिल्यास बॅज व परवाना रद्द केला जाईल.

ही माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. राज्यात 1988 पासून असलेल्या नियमाच्या आधारे रिक्षा आणि टॅक्सी चालविण्यासाठी व्यावहारिक मराठीचे ज्ञान आवश्यक आहे. 12 ऑगस्ट रोजी केलेल्या संबंधित कायदेशीर तरतुदीनुसार आता या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

हेही वाचा- Manoj Jarange Strike : मनोज जरांगेंचा आंदोलनाचा प्लॅन B समोर; मुंबईऐवजी आता 'या' ठिकाणाहून फुंकणार उपोषणाचं रणशिंग

मराठी बोलता येत नाही, अशी भूमिका घेणाऱ्या चालकांवर कायद्याच्या चौकटीत कारवाई करणे हे परिवहन विभागाचे कर्तव्य आहे. रिक्षा-टॅक्सी परवाना किंवा बॅज मिळविण्यासाठी बनावट अधिवास प्रमाणपत्रांचा वापर होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. संबंधित व्यक्ती महाराष्ट्रात 15 वर्षांपासून वास्तव्यास आहे का, याची पडताळणी तसेच पोलिसांमार्फत चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश आरटीओ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. 

मराठी येत असेल तर नवा बॅज
राज्यात यापुढे नवीन परवाना व बॅज देताना चालकाला व्यावहारिक मराठीचे ज्ञान आहे की नाही, याची आरटीओ अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष संवादाद्वारे तपासणी केली जाईल. त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही केले जाईल. मराठीचे व्यावहारिक ज्ञान असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच बॅज देण्यात येणार आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number