इराण-अमेरिका युद्धाचा परिणाम आता जगावर दिसून येत आहे. भारतात आता याचे पडसाद उमटताना बघायला मिळत आहेत. घरगुती गॅसमध्ये दरवाढ झाली आहे. अशातच आता आता एलपीजी गॅस दरवाढीने ऑटो रिक्षाचालकही अडचणीत आले आहेत. त्यामुळे एलपीजी गॅसवरील रिक्षाचे भाडेवाढ होण्याची शक्यता आहे.
आखाती देशातील युद्धाचा ऑटो एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. दरवाढीमुळे रिक्षाचालक अडचणीत आले आहेत. भाडेवाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारने ऑटो एलपीजी गॅस दरवाढीवर तोडगा काढावा अशी मागणी रिक्षा चालक आणि संघटनांनी केली आहे. असे न झाल्यास प्रवासही महाग होऊ शकतो. त्यामुळे आता यावर कोणता तोडगा निघतो हे पाहण्यासारखे आहे.
जर गॅस संपला आणि नवीन पुरवठा आला नाही, तर घरांमध्ये स्वयंपाकाच्या गॅसचे संकट अधिकच वाढेल, ज्यामुळे लोकांना जगण्यासाठी आवश्यक असलेले अन्न शिजवणे कठीण होईल. दरम्यान गॅस दरवाढीचा परिणाम हॉटेल व्यावसायिकांवरदेखील होताना दिसून येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, तेल कंपन्यांकडे फक्त दोन दिवसांचा गॅस शिल्लक आहे. परिस्थिती अशी झाली आहे की बहुतेक एजन्सींकडे फक्त दोन दिवसांचा गॅस शिल्लक आहे. परिस्थिती पाहता, आजपासून मुंबई आणि बेंगळुरूमधील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स बंद राहतील.
या समस्येबाबत आहार संघटना केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांशी संवाद साधत आहे. तसेच राज्यातील अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची मंगळवारी संघटनेचे प्रतिनिधी भेट घेणार असून गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली जाणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.