राज ठाकरेंवर गुन्हा दाखल

राज ठाकरेंवर गुन्हा दाखल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबादेतील सिटी चौक पोलिसांनी राज ठाकरेंविरोधात कारवाई केली आहे. औरंगाबाद सभेत पोलिसांनी त्यांना १६ अटी शर्थीचं पालन करण्याचं बजावलं होतं. मात्र, त्यातील १२ अटींचं उल्लंघन केल्याप्रकरणी राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज ठाकरे यांच्यावर नेमका कोणत्या कलमांतर्गत गुन्हा?

कलम -१३५ – अटी शर्तींचा भंग करणे
कलम १५३ – दोन समूहात भांडण लावणे
कलम ११६ – गुन्हा करण्यासाठी मदत
कलम ११७ – गुन्ह्याला मदत करणे, चिथावणीखोर भाषण

  • नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार राज ठाकरे हे प्रथम क्रमाकांचे आरोपी.
  • सभेला परवानगी मागणारे राजीव जवळीकर आणि आयोजकांवर गुन्हा दाखल.

दरम्यान, राज ठाकरेंवर आजच कारवाई होणार असल्याची माहिती पोलीस महासंचालकांनी दिली आहे. तसेच मनसेच्या १५ हजार कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच १३ हजार लोकांना नोटीस पाठवण्यात आली असल्याची माहिती पोलीस महासंचालकांनी दिली आहे. तर एसआरपीएफच्या ८७ तुकड्या आणि ३० हजारांपेक्षा जास्त होमगार्ड तैनात करण्यात आले असल्याचे पोलीस महासंचालकांनी सांगितले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version