कलम हटवण्यात आमचा विरोधच – पाकिस्तानी पराराष्ट्र मंत्रालय

जम्मू-काश्मीरमधील कलम 370 आणि 35 ए हटवले असून पाकिस्तानी संरक्षण समितीने बैठक घेतली. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. तसेच पाकिस्तान सर्व पातळीवर भारताच्या या निर्णयाचा विरोध करत असल्याचे पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे. 370 आणि 35 ए हटवण्यात सरकार यशस्वी – भारताच्या ऐतिहासीक निर्णयानंतर पाकिस्तानी संरक्षण समितीने बैठक घेतली. जम्मू- […]

कलम हटवण्यात आमचा विरोधच – पाकिस्तानी पराराष्ट्र मंत्रालय
जम्मू-काश्मीरमधील कलम 370 आणि 35 ए हटवले असून पाकिस्तानी संरक्षण समितीने बैठक घेतली. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. तसेच पाकिस्तान सर्व पातळीवर भारताच्या या निर्णयाचा विरोध करत असल्याचे पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे.

370 आणि 35 ए हटवण्यात सरकार यशस्वी –

भारताच्या ऐतिहासीक निर्णयानंतर पाकिस्तानी संरक्षण समितीने बैठक घेतली.
जम्मू- काश्मीरमधील कलम 370 आणि 35 ए हटवण्याची भारताची कृती बेकायदेशीर असल्याचे पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.
तसेच पाकिस्तान सर्व पातळीवर भारताच्या निर्णयाचा विरोध करत असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
कलम हटवण्याबाबत विरोधकांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली.

अमित शाह यांचे राज्यसभेत प्रस्ताव!

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीर राज्याला स्वतंत्र दर्जा देणारे वादग्रस्त 370 कलम अंशत: हटवण्याचा प्रस्ताव राज्यसभेत सादर जम्मू-काश्मीर राज्याच्या पुनर्रचनेचा महत्त्वाचा प्रस्तावही राज्यसभेत करण्यात आला आहे.कलम 370 मधील अनुच्छेद क्रमांक एक वगळून इतर सर्व अनुच्छेद हटवण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत सादर केला आहे. यावेळी विरोधकांनी मोठा गोंधळ घातला.

केंद्र सरकारकडून संसदेत जम्मू-काश्मीरच्या विभाजनाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. आतापर्यंत जम्मू-काश्मीरचा हिस्सा असणार लडाख वेगळं व्हाव हा ही प्रस्ताव मांडण्यात आला आहे.प्रस्तावानुसार जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश असणार आहेत. लडाख हा मंत्रिमंडळ नसलेला केंद्रशासित प्रदेश असेल असं या प्रस्तावात म्हटलं आहे.

यामुळे जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा संपणार आहे. कलम 370 मधील फक्त एक खंड लागणार असल्याचं प्रस्तावात म्हटलं आहे. तब्बल 72 वर्षानंतर काश्मीरची सुटका झाल्याचं बोलंल जात आहे. या प्रस्तावाला बसपाने पाठिंबा देण्यात आला आहे. हा देशातील इतिहासातील मोठा निर्णय मानला जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number